नवी दिल्ली : भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त सापडला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकर राव शिंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या 14 जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार

नंदुरबार – हीना गावित 
धुळे –  सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुरी – अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव शिंगारे
सांगली – संजयकाका पाटील

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची यादी जाहीर होत असताना मात्र भाजपने एकही उमेदवार यादी जाहीर न केल्यामुळे सर्व जण आश्चर्यचकित होते. भाजप शुभ मुहूर्ताची वाट पाहत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + 14 =