चौफेर न्यूज – भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी ख्रिस्ती मिशनरींच्या इशाऱ्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे, असे मत उत्तर प्रदेशातील भाजप खासदार भरतसिंह यांनी व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वात भाजपची आगेकूच ख्रिस्ती मिशनऱ्यांना सहन होत नाही. त्यामुळे ख्रिस्ती मिशनरी व त्यांच्या इशाऱ्यावरून पैसे मिळणारे लोक पुतळ्यांची विटंबना करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

भरतसिंह हे उत्तर प्रदेशातील बलिया येथील खासदार आहेत. राज्यात बलिया, जौनपुर, सीतापुर सहित अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या विटंबनेच्या घटना समोर आल्या होत्या. ख्रिस्ती मिशनरी आर्थिक प्रलोभन देऊन मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. मुस्लिम संस्थाही हेच काम करत आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान, भरतसिंह यांच्या विधानावर विरोधी पक्षांनी प्रखर टीका केली आहे. भाजपचे नेते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या विटंबनेमागे पाकिस्तानचा हात असल्याचेही सांगू शकतात, असे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस रमाशंकर विद्यार्थी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + 19 =