चौफेर न्यूज ः भाजपच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते खालच्या पातळींवर जाऊन काँग्रेस नेत्यांवर टीका करीत आहेत, वास्तविक पाहता ते सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहेत, यामुळेच जनतेचा काँग्रेसला भरभरून पाठिंबा मिळत आहे. आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे, असे मत प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त युवक काँग्रेसच्या चलो वार्ड अभियानाचा शुभारंभ मोरवाडी येथून करण्यात आला. प्रसंगी, पृथ्वीराज साठे यांच्या हस्ते अभियानाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक अख्तार चौधरी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर काँग्रेसचे पदाधिकारी कांबळे, मुनसाब शेख, तुषार पाटील, युवक काँग्रेसचे पदाधिकारी गौरव चौधरी, विरेंद्र गायकवाड, कुदंन कसबे, युसुफ पठाण, शफी शेख, हिरा जाधव, संदेश बोर्डे, नासीर चौधरी, शिवराज वाघमारे, रशीद सय्यद, मेहबूब शेख, बाळासाहेब डावरगावे, बाळासाहेब गायकवाड, दादा शिरोळे, सईद खान, एजाज चौधरी, आफताब चौधरी आदी उपस्थित होते. या अभियानातंर्गत युवा शक्ती कार्डद्वारे युवकांची नोंदणी करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र बनसोडे, आभार प्रदर्शन गौरव चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − 2 =