चौफेर न्यूज – एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकणाऱ्या द. आफ्रिकेच्या संघाला धक्का बसला असून आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलिअर्स दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे. तो पहिले तीन सामने त्याच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.

डीव्हिलियर्सच्या उजव्या हाताच्या बोटाला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी दरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत बरी होण्यासाठी त्याला जवळपास दोन आठवडे लागणार आहेत. तो वॅन्डरर्समध्ये होणाऱ्या चौथ्या सामन्यामध्ये खेळेल, अशी आपेक्षा आहे. १ फेब्रुवारीपासून भारत आणि द.आफ्रिकेमध्ये ६ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. मात्र एबी डीव्हिलिअर्स दुखापतग्रस्त झाल्याने आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. एबीडी व्हिलिअर्स सध्या चांगल्या फॉर्मात असून कसोटी मालिकेमध्ये त्याने आफ्रिकेच्या विजयामध्ये महत्वाची भुमिका बजावली होती. आता एबी डी व्हिलिअर्सच्या जागी पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आफ्रिकेच्या संघात खाया झोन्डोची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − four =