पिंपळनेर भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. श्रावणातल्या या महत्त्वाच्या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे.

‘भया मेरे राखी के बंधन को निभाना’, ‘बेहनोंने भाई की कलाई पे प्यार बांधा है’  अशाच काही गितांच्या ओळीप्रमाणे पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये भावाबहिनीचे प्रेम व्यक्त करणारा रक्षाबंधन सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. मुलींनी मुलांना राख्या बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

बहिण आपल्या भावाच्या मनगटाला राखी बांधून आपल्या रक्षणची जबाबदारी सोपवत असते, राखीचा धागा किती अनमोल असतो याबाबत वर्षा भामरे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. रक्षाबंधन एक त्योहार नही बलकि हमारे परंपरावो का प्रतीक है, असे अनिता पाटील यांनी रक्षाबंधनाचे महत्व पटवून देतान नमूद केले. आयुष देसले, क्रांती मनोरे, वर्णित मनोरे या विद्यार्थ्यांनी भावाबहिणीचे नाते कसे  असते, हे बेहना ने  भाई के कलाइ पे प्यार बांधा है, या गीतातून व्यक्त केले. प्रसंगी, ज्योत्स्ना भदाणे यांनी रक्षाबंधन निमित्ताने राखी कशी तयार करावी, याचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून घेतल्या. तसेच, विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उतेजनार्थ बक्षीस दिले. पुरु व सिकंदर राजाची गोष्ट सांगून रक्षाबंधन का साजरा केला जातो, याचे महत्व प्राचार्य वैशाली लाडे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्रसंगी, चिमुकल्या मुलींनी मुलांच्या हातावर राख्या बांधल्या. तसेच, चिमुकल्या मुलांनी देखील मुलींना भेटवस्तू दिल्या. बहिन भावाला राखी बांधतानाचे चित्र सुंदर अशा रांगोळीतून शिक्षीकांनी रेखाटले. त्याचबरोबर “धिस ईज अ बॉन्ड ऑफ लव्ह, इट ईज अ ट्रेअड दॅट बाईंडस ओव्हर लाईव्ह ॲड ओव्हर हर्ट ” असा भावाबहिनीच प्रेम व्यक्त करणारा संदेश फलक लेखनातून दर्शविण्यात आला.  पूजा नेरकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 3 =