चौफेर न्यूज माझ्यावर निराधार आरोप करीत प्रकाश आंबेडकर यांनी अटकेची मागणी केली असून याबाबत भीमा-कोरेगाव प्रकरणाची राज्य शासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी दिले आहे.

आपल्या निवेदनात गुरुजींनी म्हटले आहे, की मी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीवेळी उपस्थित होतो व कारणीभूत आहे असे विधान केले आहे. प्रत्यक्षात मी त्या दिवशी सांगली मुक्कामी असताना माझ्यावर हा आरोप त्यांनी केला आहे. याकूब मेमनची वाट मला दाखविण्याची मागणी केली आहे. आसेतू सारा हिंदुस्थान एकरूप करण्याचा प्रयत्न मी व माझे कार्यकर्ते करीत असताना हे करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. याची शासनाने सखोल चौकशी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven − 1 =