भोसरी ः भोसरी येथील स्नेहवन संस्थेला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी भेट दिली. डॉ. प्रकाश आमटे यांनी स्नेहवनची आजपर्यंतच्या वाटचालीची विचारपूस केली. तसेच, मुलांशी गप्पा मारत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. स्नेहवनला आणि मुलांना रिअल हिरो डॉ. प्रकाश आमटे यांचे आशीर्वाद लाभले. त्यांच्या सोबत शास्रज्ञ डॉ. मोहन वाणी, डॉ. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. स्नेहवन ही संस्था गेल्या चार वर्षापासून आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार, शेतमजूर यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनाचे काम अतिशय खडतर परिस्थितीत करत आहे. अशोक देशमाने व त्यांची पत्नी अर्चनाने बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून संपूर्ण आयुष्य या कार्यासाठी वाहून घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 4 =