ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी उपलब्ध होणार सोय

पिंपरी कृष्णानगर येथील श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार सभामंडप आणि सीमा भिंतीचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच निगडीतील मारुती मंदिरात देखील सभामंडपाचे काम सुरु करण्यात आले आहे. महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून हे काम केले जात असून  कामगार नेते सचिन लांडगे यांच्या हस्ते आज (मंगळवारी) कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

कृष्णानगर येथील सिद्धीविनायक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पावसापासून संरक्षण होण्यासाठी सभामंडप आणि सीमा भिंतीचे काम करुन देण्याची मागणी केली होती. श्री विठ्ठल आणि श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरासमोरील प्रांगणात लहान मुलांना खेळ, तसेच कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. योगासने शिबिरे असतात. ज्येष्ठ नागरिक विरंगुळ्यासाठी बसतात.  त्यामुळे उन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी सभामंडप आणि सीमा भिंत बांधून देण्याची मागणी परिसरातील सोसायटीतील नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे केली होती. त्याला आमदार लांडगे यांनी तत्काळ होकार दिला.

लांडगे यांच्या आमदार निधीतून   सभामंडप आणि सीमा भिंतीचे काम सुरु करण्यात आले आहे. आजपासून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अजय सायकर, योगेश काळे, महेंद्र भालेराव, रामचंद्र लोंढे, यांच्यासह परिसरातील गृहनिर्माण सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निगडीतील मारुती मंदिरात देखील सभामंडप बांधून देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांच्या मागणीनुसार सभामंडपाचे काम सुरु करण्यात आले आहे. सचिन लांडगे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

सचिन लांडगे म्हणाले, गृहनिर्माण सोसाट्यांमधील सर्व समस्या सोडविल्या जातील. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही अडचण असेल ती मार्गी लावली जाईल. त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. सभामंडप आणि सीमा भिंतीचे काम जलदगतीने करुन वेळेत पुर्ण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 − three =