चौफेर न्यूज – भोसरी येथील फुलेनगरमध्ये एका तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.

श्रीदेवी शरणाप्पा पाटोळे (वय-17, रा. फुलेनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रादेवी ही अकरावीमध्ये शिकत होती. काल रात्री तिने घऱातील स्वयंपाक घरात स्कार्फच्या सहायाने गळफास घेतला. आज सकाळी आईने स्वयंपाक घराचा दरवाजा ठोठावला परंतु आतुन काहीच प्रतीसाद मिळाला नाही. त्यामुळे तिच्या आई-वडीलांनी दरवाजा तोडला असता हा प्रकार उघडकीस आला. मृतदेह पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + ten =