पिंपरी चिंचवड ः भांडणे सोडवली नाहीत म्हणून एका इसमाने व्यावसायिकाला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडली. हालगौडा शिवलिंग ओंकार (वय 44, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार यांची एमआयडीसी भोसरी येथे कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला गुरुवारी सुट्टी होती. त्यामुळे त्यांनी सायंकाळी कंपनीतून चक्कर मारायचे ठरवले. त्यांनी कंपनीत चक्कर मारून ते कंपनीच्या बाहेर आले. कंपनीच्या बाहेर रस्त्यावर तीन व्यक्ती आणि एका तरुणीची भांडणे सुरु होती. ओंकार यांनी त्या भांडणांकडे दुर्लक्ष करून कारमधून जात असताना त्यातील एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि ‘आमची भांडणे सोडव आणि आम्हाला घरी नेऊन सोड’ असे म्हणाला. त्यावर ओंकार यांनी नकार दिला असता त्या व्यक्तीने त्यांना मारहाण केली. यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight − 2 =