भोसरी  :-  भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष निधीतून व भोसरी विधानसभेतील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार तथा भोसरी-खेड विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध विकासविषयक कामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

भोसरीतील संकल्प गार्डन, वडमुखवाडी येथील मंजूर बस थांब्याच्या उदघाटनाबरोबरच रूपीनगर, जाधववाडी, चिखली, चर्होली,भोसरी, दिघी, यमुनानगर, डुडुळगाव इंद्रायणी नगर, मासूळकर कॉलनी येथील शिवसेना शाखेच्या नामफलकाचे उदघाटनही आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरात विविध ठिकाणी झालेल्या उदघाटन कार्यक्रमास शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संपर्कप्रमुख इरफान सय्यद, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, जिल्हा उपप्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, वेदश्री काळे, परशुराम आल्हाट, अभिमन्यू लांडगे, आशा भालेकर, नेताजी काशीद, विश्वनाथ टेमगिरे, सुखदेव नरळे, अक्षदा शेळके, प्रदीप चव्हाण तसेच विविध ठिकाणचे शाखा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी खासदार आढळराव म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत इरफान सय्यद हे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार असून, इरफान सय्यद यांनी बऱ्याच दिवसांपासून भोसरी मतदारसंघात विविध उपक्रमांद्वारे आपले शक्ती प्रदर्शन केले आहे. या मतदार संघात झालेल्या या ४८ शाखा नामफलकाचे उदघाटन तसेच बस थांब्याचे उदघाटन हे शिवसेना उपनेते शिवाजिदादा आढळराव पाटिल आणि इरफान सय्यद यांच्या मार्गदर्शनाखालीच झालेले असून यावेळी जिल्हा संघटिका सुलभा उबाले, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट,उपशहरप्रमुख आबा लांडगे, नेताजी काशिद,विभाग प्रमुख सुखदेव नरले, राजू भुजबळ,योगेश बोराडे,प्रदीप सपकाळ, योगेश जगताप,कृष्णा वाळके,संतोष वाळके,अनिल दुराफे,कुंडलिक लांडगे,विश्वनाथ टेमगिरे,रामदास गाढवे, प्रदीप चव्हाण, समन्वयक सर्जेराव भोसले,अनिल सोमवंशी,परशुराम आल्हाट,राहुल गवली, दत्तात्रय भालेराव,महिलाशहर संघटिका वेदश्री काळे, आशा भालेकर, विभागप्रमुख अक्षदा शितोले,यूवासेनेचे सूरज लांडगे, रूपेश कदम,कुणाल जगनाडे,सचिन सानप,देवा कुलकर्णी, अमित शिंदे व प्रत्येक शाखेचे उपविभागप्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, व शिवसैनिका उपस्थित होते.त्यांच्या या कार्यक्रमातील कार्यकर्त्यांचा उत्साह तसेच या मतदारसंघातील नागरिकांचा प्रतिसाद पाहून समाधान वाटले व या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्याचा झपाटा आणखी विस्तारणार याची खात्री झाली.

इरफान सय्यद म्हणाले की, देशाच्या अर्थसंकल्पात लोकसभा खासदारांना त्यांच्या मतदारसंघात वा संबंधित क्षेत्रातील विकास आणि विकासविषयक कामांसाठी खर्चाची तरतूद म्हणून दरवर्षी कोटय़वधींची आर्थिक तरतूद करण्यात येत असली तरी, यापैकी अधिकांश निधी खासदारांद्वारे विकास विषयक कामांवर खर्च करण्यासाठी बहुतांश खासदारांना वेळच नसतो. ही एक आश्चर्यकारक वस्तुस्थिती आहे. परिणामी मंजूर झालेला सार्वजनिक निधी त्यांच्या वापराविना पडून राहतो व देशभरातील मतदार व जन-सामान्यांशी निगडित असे रस्ते, आरोग्य, शिक्षण व सार्वजनिक स्वच्छता यासारखे मुद्दे दुर्लक्षित राहतात. परंतु, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे एक वेगळच रसायन. जनसामान्यांचा विकास हे एकच ध्येय त्यांनी खासदार असताना पाहिलं. अनं त्यासाठीच अहोरात्र झटले. खासदार असताना त्यांनी शहराला भेट दिली. विकासकामांची पाहणी केली. त्यातली त्यात अर्धवट असणाऱ्या कामांची पाहणी करून त्यासाठी त्यांनी वरिष्ठ पातळीवर निधी मंजूर करण्यासाठी शिफारस केली व त्यातूनच आजच्या विकासकामांचे त्यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 4 =