चौफेर न्यूज – पुन्हा मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी तात्काळ त्या महिलेला सेंट जॉर्ज रूग्णालयात दाखल केले आहे. शकुंतला विठ्ठल झाल्टे असं या वृद्ध महिलेचे नाव आहे. या महिलेने पत्र लिहून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप कळू शकले नाही. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रालयात किंवा मंत्रालय परिसरात आत्महत्येचे वेगवेगळे प्रयत्न झाल्याचे बघायला मिळाले. यातील धर्मा पाटील यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतरही आत्महत्येचे काही प्रयत्न झालेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली आहे.

राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्याकडून चौकशी…

या घटनेची दखल घेत राज्यमंत्री प्रविण पाटील यांनी थेट रुग्णालय गाठून शकुंतला झाल्टे यांची भेट घेतली. शकुंतला झाल्टे यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती घेवून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + 11 =