चौफेर न्यूज – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी त्यांच्या घरोघरी गेले पाहिजे, तसेच मतदारांना भेटवस्तू दिल्या पाहिजेत, असा अजब सल्ला दिला आहे. त्यांनी सांगलीमध्ये आयोजित भाजपच्या बूथ पदाधिकारी मेळाव्यात दिलेल्या या सल्ल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

राजकीय पक्षांनी सांगली महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच आपली कंबर कसली आहे. त्यामुळे सांगली महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी भाजप मैदानात उतरला आहे. भाजपच्या बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण मेळावा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी उपमहापौर शेखर इनामदार यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बूथप्रमुखांना मार्गदर्शन करताना बूथप्रमुखांनी मतदारांशी संपर्क वाढवला पाहिजे, असे सांगितले आहे. एका बूथ पदाधिकाऱ्याच्या क्षेत्रात २०० घर येत असतील, तर त्या बूथप्रमुखाने त्या मतदाराच्या घरी गेले पाहिजे. त्यावेळी नुसतीच विचारपूस करण्याऐवजी एक भेटवस्तूदेखील दिली पाहिजे, असा सल्ला यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 3 =