नगरसेविका अश्‍विनी चिखले यांची निवड
पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)च्या पिंपरी-चिंचवड महापालिका गटनेतेपदावरून अनंत कोर्‍हाळे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी नगरसेविका अश्‍विनी मराठे-चिखले यांची निवड करण्यात आली. याबाबत विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम आणि महापौर शकुंतला धराडे यांना पत्र
दिले आहे.
मनसेचे 2012 च्या महापालिका निवडणुकीत चार नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी अनंत कोर्‍हाळे यांची मनसेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी कोर्‍हाळे यांच्या पत्नीने मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. प्रवेशावेळी अनंत कोर्‍हाळेही तिथे उपस्थित होते. त्यामुळे अनंत को-हाळेसुद्धा शिवसेनेच्या वाट्यावर असल्याने पक्षाने त्यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी नगरसेविका अश्‍विनी मराठे – चिखले यांची निवड केली आहे.
नगरसेविका अश्‍विनी चिखले यांना गटनेता म्हणून मान्यता मिळावी आणि त्याची महापालिकेच्या दप्तरी नोंद करण्यासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम आणि पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांना पक्षाने पत्र
दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − three =