भोसरी ः रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका 60 वर्षीय मनोरूग्ण महिलेवर अत्याचार  करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 13 जून पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

विजय लुलु बोंगा (वय-21, रा. गोदाळवाही, कारवाफा, गडचिरोली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एमआयडीसी येथील प्रगती इंजिनिअरींग कंपनीसमोरील पत्राशेडमध्ये मनोरूग्ण महिला झोपली होती. त्यावेळी आरोपी विजय बोंगा याने  झोपलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घातला. बेशुध्द झालेल्या झालेल्या महिलेवर आरोपीने अत्याचार केला. शुध्दीवर आलेल्या महिलेने आरडाओरडा केल्याने तरुण पळून जाऊ लागला. परिसरातील नागरिकांनी पाठलाग करून आरोपी  पकडले. त्याला चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मनोरूग्ण महिलेला ससून रूग्णालयात दाखल केले आहे.  फौजदार एच. बी. कोकणी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 − one =