चौफेर न्यूज – शहरातील नागरिक मयत झाल्यानंतर मृत्यू दाखल देताना मतदार यादीतून नाव वगळण्याचा फॉर्म क्र.७ भरून देणे बंधनकारक केल्यास मतदार यादीतून मयत मतदाराचे नावे वगळणे सोयीस्कर होऊन कामाला वेगही प्राप्त होईल, यासाठी महानगरपालिकेने हा अभिनव उपक्रम राबवावा अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनाला दिल्या.

मतदार यादीतील मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जात नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून येत नाही. यावर उपाय म्हणून महापालिकेने ही प्रक्रिया राबविल्यास अशी प्रक्रिया राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि देशातील एकमेव महानगरपालिका ठरेल व त्यामुळे मनपाच्या नावलौकिकात भरही पडेल.

मुत्यू दाखल घेताना अर्जदाराने मतदार यादीतून मयताचे नाव वगळण्याचा फॉर्म क्र. ७ तात्काळ भरून द्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 3 =