महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकार्‍यांची खारदारांकडे मागणी

पिंपरी चिंचवड ः मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याकरिता लोकसभेत आवाज उठवावा, या मागणीसाठी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांची महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड पदाधिकार्‍यांनी गुरुवारी भेट घेतली.
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट घेतली. साहित्यिकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी येत असलेल्या अडचणी दूर कराव्या, त्यासाठी लोकसभेत पाठपुरावा करावा, या आशयाचे निवेदन सादर केले. मराठी भाषेचा प्रश्‍न लवकर मार्गी लावावा, अशी विनंती करण्यात आली.

केंद्र सरकारकडे प्रस्ताप प्रलंबित…
निवेदनात म्हटले आहे की, रंगनाथ पठारे समितीने पाठवलेल्या अहवालानुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी असलेले निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने आवाज उठविण्याची गरज आहे. मसाप पिंपरी चिंचवड तीन वर्षांपासून या मागणीकडे लक्ष वेधून पाठपुरावा सुरु केला आहे. तसेच मराठी प्राध्यापकांचे चर्चासत्र तसेच मराठी भाषिकांच्या सह्यांचे निवेदन पंतप्रधान कार्यालयास पाठविले होते. या सर्व बाबींकडे मसाप पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष श्रीमती विनिता ऐनापुरे, कार्यवाह संजय जगताप, नाना दामले, अपर्णा मोहिले, किरण लाखे, डी. बी. शिंदे , प्रतिभा कुलकर्णी, श्रीकांत जोशी, विनोद गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते. खासदार बारणे यांनी मराठी भाषेचा हा प्रश्‍न प्रत्येक मराठी भाषिकासाठी जिव्हाळ्याचा असल्याचे सांगून त्यासाठी लोकसभेत आवाज उठवून पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen + 17 =