सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई 
   

चिंचवड ः स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या चिंचवडगावातील ‘स्पा ग्लो’ या सेंटरवर सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखेने छापा टाकून तीन मुलींची सुटका केली. स्पा मालकाला गजाआड केले.
अविनाश देवीदास जोगदंड असे अटक केलेल्या मसाज चालकाचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचडगावातील स. नं. 799/6 येथील गावडे बिल्डींगमध्ये आरोपी जोगदंड हा ‘स्पा ग्लो’ नावाने मसाज सेंटर चालवत होता. या पार्लरमध्ये ठेवलेल्या थेरपीस्ट मुलींकडून आरोपी जोगदंड वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. याची खात्री करून   पोलीसांनी शुक्रवारी मसाज सेंटरवर छापा टाकला. छाप्यात एक नेपाळी व दोन पुणे शहरातील अशा तीन मुलींची सुटका केली. तसेच मसाज सेंटरमधून 5500 रूपयांची रोकड, 2 मोबाईल, लिव्ह ऍड लायसन्स करारनामा, बॅकेचे धनादेश आदी साहित्य जप्त केले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, प्रमोद म्हेत्रे, नितीन तरटे, रमेश लोहकरे, राजेश उंबरे, नितीन लोंढे, कविता नलावडे, ननिता येळे, सुप्रिया शेवाळे, रूपाली चांदगुडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आदींच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 4 =