चौफेर न्यूज – आर्थिक वर्ष सुरू होताना पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी दरांचा उच्चांक गाठला. आयकराच्या अधिभरात एक टक्क्यांनी वाढ झाली. तसेच काही मार्गावर टोलचे दर वाढवून आधीच आर्थिक ओझ्याखाली दबलेल्या जनतेवर सरकारने मोठ चोळण्याचे काम सुरू केले आहे. सत्तेत येण्यापुर्वी किरकोळ दरवाढ, महागाई वाढली की भाजपचे नेते रस्त्यावर उतरत होते. परंतू, महागाई गगनाला भिडली असताना विरोधातील कॉंग्रेस काहीच करताना दिसत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते अरूण बकाल यांनी व्यक्त केली आहे.

बकाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सत्तेत येण्यापुर्वी भाजपने महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू, प्रत्यक्षात पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य सर्वच गोष्टींचे भाव आज गगणाला भिडले आहेत. याविरोधात ना लोकप्रतिनिधी, ना राजकीय पक्ष, ना कुठली विद्यार्थी संघटना, ना सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत. कॉंग्रेस सारखा मोठा पक्षही महागाई विरोधात आंदोलन करत नसल्याबाबत आश्चर्य वाटते. त्यामुळे जनतेवर कितीही बोजा टाकला तरी बिचारी जनता सर्व सहन करत आहेत. इतर कोणत्याही कारणामुळे मोर्चे निघत असताना महागाईच्या विरोधात मोर्चे का निघत नाहीत, असा सवाल बकाल यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 3 =