साक्री – महात्मा देश स्वातंत्र्यासाठी मोठे कार्य केले. स्वातंत्र्य हे हिंसेने नव्हे तर अहिंसेने मिळविता येते, यावर विश्वास ठेवून जगाला अहिंसेचा संदेश दिला, असे मत प्राचार्या भारती पंजाबी यांनी व्यक्त केले.

येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमीत्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी विद्यार्थ्यांना माहिती देताना त्या बोलत होत्या. जयंतीनिमीत्त स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी आकर्षक असे फलक लेखन प्रिती लाडे, हिरल सोनवणे यांनी केले. व्यवस्थापक वैभव सोनवणे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. महात्मा गांधींच्या जीवन चरित्रावर सविता मोरे यांनी प्रकाश टाकला. तसेच, महात्मा गांधींविषयी गीत प्रिती लाडे, मनिषा खैरनार यांनी सादर केले. प्रसंगी, घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी इयत्तेनुसार विषय देण्यात आले होते. यामध्ये नर्सरी – कार्टुन, एलकेजी –स्वच्छतेचे साधने, युकेजी – सुर्य, चंद्र, कार, बॅट इ. विषयानुसार एक वाक्य, तसेच आवाज व वेशभुषा या मुद्द्यांवरून गुणांकन करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल – जय बागले, प्रणिती गांगुर्डे, आयुष माळीचकर, सौम्या ठाकरे. युकेजी डायमंड – निहारिका बोरसे / प्रणिती खैरनार, पार्थ जैन, निरव सोनवणे, रिद्धी सोनवणे / लक्ष्मी देवरे. एलेकजी गोल्ड – धैर्या शेवाळे, तेजास्विनी खैरनार, भुमी बेडसे, पुष्पांजली भामरे. युकेजी लोटस – शिवाजी सोनवणे, प्राप्ती वाघ / राजवी अहिरराव, इशान तडवी, मोक्षदा गांगुर्डे. युकेजी रोझ – आरव देसले, शर्वरी नंदनवन, भावेश गांगुर्डे, प्रणित बागुल, तनिष्का नितीन सोनवणे. या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पूनम पवार यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × two =