पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्य पदाच्या निवडी येत्या 20 मे रोजी महासभेत होणार आहेत. या समित्यांतील सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत. त्यांनी लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केले. याबाबत साने यांनी दिलेल्या प्रसिध्दपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 30 अन्वये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विशेष समितीच्या सदस्य (विधी, शहर सुधारणा, महिला व बाल कल्याण व क्रीडा समिती) पदाच्या नियुक्त्या सोमवार दि. 20 मे 2019 रोजी होणार्‍या महापालिका सभेत होणार आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या इच्छुक सदस्यांनी या विशेष समित्यांच्या सदस्य पदासाठी (विधी, शहर सुधारणा, महिला बाल कल्याण व क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती समिती ) त्यांनी लेखी अर्ज  दि. 17 मे 2019 रोजी दु. 5 वाजेपर्यंत विरोधी पक्षनेता यांच्या कार्यालयात समक्ष आणून द्यावेत. असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + 14 =