चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रभाग क्रमांक १४ मोहनगर, काळभोरनगर परिसरात विकास कामांसाठी विविध आरक्षणे टाकली आहेत. त्यातील गर्भनिदान रुग्णालय, खेळाचे मैदान, भाजी मंडई, उद्यान अशी महत्वाची आरक्षणे आहेत. महापालिकेने तातडीने ही आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करावीत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका मिनल यादव यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका यादव यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १४ मोहनगर, काळभोरनगर परिसरात विकास कामांसाठी महापालिकेच्या वतीने अनेक जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यातील काही आरक्षणे पालिकेच्या ताब्यात आली आहेत. तर, काही आरक्षणे अद्यापही ताब्यात आली नाहीत. यामध्ये गर्भनिदान रुग्णालय, खेळाचे मैदान, भाजी मंडई, उद्यानाचे आरक्षण आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने आरक्षित मोकळ्या जागा संपादित कराव्यात.

महापालिकेच्या ताब्यात घेण्यात घ्याव्यात. त्यावरील आरक्षण विकसित करावे. आरक्षण विकसित केल्यास प्रभागातील नागरिकांना त्या सुविधेचा उपयोग होईल. आरक्षणाचा मुख्य उद्देश देखील साध्य होईल. त्यासाठी महापालिकेने तातडीने आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करावीत, अशी मागणी नगरसेविका यादव यांनी निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + six =