चौफेर न्यूज सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सोमवारी महिला बचत गटांच्या विविध वस्तूंच्या प्रदर्शन ‘दक्खन’ जत्रेत भरवण्यात आले. या जत्रेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल विकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना कर्ज दिले की त्या शंभर टक्के कर्जाची परतफेड करतात, पण पुरुष मंडळींना कर्ज दिल्यावर बहुतेक पुरुष कर्जाची परतफेड करण्याऐवजी पार्टी, कोंबड्या, बकऱ्यांमध्ये अडकतात, असा मिश्किल टोला लगावला.

दरम्यान पंकजा मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून बचत गटांसाठी शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन दिले जात असल्याचे सांगितले. शिवाय दिलेले कर्जही त्या वेळेत परतफेड करतात असेही पंकजा यावेळी म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी हाच धागा पकडत पुरुष मंडळींनी घेतलेल्या कर्जावर मार्मिक टोलेबाजी केली. यावेळी माझ्या इशाऱ्यावर जाऊ नका, असे मिश्किल उत्तर मुख्यंमत्र्यांनी देताच एकच हास्यकल्लोळ उडाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − thirteen =