चर्‍होली ः जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग करून मारहाण करणार्‍याला पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी बाराच्या सुमारास चर्‍होली येथे घडली होती. शिवराम तुकाराम मगर (वय 48, रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 37 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पीडित महिला घरात एकटी असताना आरोपी जबरदस्तीने घरात घुसला. त्याने महिलेशी अश्‍लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यावेळी महिलेने आरडा ओरडा करून विरोध केला असता आरोपीने त्यांना मारहाण केली. पीडित महिला आणि आरोपी यांचे भांडण सुरु असताना महिलेचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला. आरोपीने मुलाला देखील लाथाबुक्य्यांनी मारहाण करून दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सागर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen + 8 =