निगडीतील अपंग विद्यालयास दिलासा पुरस्कार प्रदान

निगडी ः देव ही सुंदर कल्पना आहे; पण माणसातील देव ओळखणे हे समाज उन्नतीसाठी जास्त गरजेचे आहे, असे विचार सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी अपंग विद्यालय – यमुनानगर, निगडी येथे व्यक्त केले. जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून निगडी येथील अपंग विद्यालय, यमुनानगर या संस्थेला दिलासा संस्थेच्या वतीने पहिला दिलासा पुरस्कार मानव कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संगीतकार पंडित राजू सवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अपंग विद्यालयाचे संचालक विश्‍वनाथ वाघमोडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

समाजाला दिलासा देणार्‍या संस्थांचा गौरव व्हावा…
याप्रसंगी प्रमुख पाहुणे सांगवी विकास संघाचे अध्यक्ष महेश भागवत, प्रहार क्रांती संघटनेचे दत्ता भोसले, दिलासाचे कार्याध्यक्ष प्रकाश घोरपडे, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, अ‍ॅड. अंतरा देशपांडे, सरपंच सुरेश काटे, वैशाली भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व.लक्ष्मण वाघमोडे यांचे प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी ’दिलासा’ पुरस्कारप्रदान करण्यामागची भूमिका मांडली. ते म्हणाले, आपल्या कार्याने समाजाला दिलासा देणार्‍या संस्थांचा उचित गौरव व्हावा, या उद्देशाने अपंग विद्यालय – यमुनानगर या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिलासा संस्थेने घेतल्याचे त्यांनी सांगितले. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून संस्थेची माहिती दिली.

कविता गायनाने कार्यक्रमात आली रंगत…
बाळासाहेब घस्ते यांनी गायलेल्या किसीकी मुस्कराहटोंसे पे हो निसार या चित्रपट गीताने; तसेच ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे आणि माधुरी विधाटे यांच्या कविता सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अपंग विद्यालयाला धान्य, खाऊ आणि रोख रकमेच्या स्वरूपात मदत केली. कार्यक्रमाच्या संयोजनात शरद शेजवळ, वैशाली चौधरी, उमेश सणस, तानाजी एकोंडे, शामराव साळुंखे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + fifteen =