वाकड ः घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन  मोलकरणीने मालकांच्या  सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला.   हा प्रकार गुरुवारी वाकड परिसरात घडला. वाकड पोलिसांनी आरोपी मोलकरणीला अटक केली आहे.
शिल्पा सुहास चव्हाण असे अटक केलेल्या  मोलकरणीचे नाव आहे. याप्रकरणी सनी मोहनलाल अचरा (रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी यांची आई आजारी असल्याने मागील काही दिवसांपासून सनी आणि त्यांचे वडील रुग्णालयात होते. त्यांनी घराची चावी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कविता शर्मा यांच्याकडे दिली. घराची स्वच्छता करण्यासाठी शिल्पा चव्हाण गुरुवारी सनी यांच्या घरी आली. तिने घरकाम करत असताना घरातील कपाटातून 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि 4 हजार 700 रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 24 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. रात्री सनी घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
वाकड पोलिसांनी  12 तासात आरोपी मोलकरणीला अटक केली.  ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, तपास पथकातील पोलीस कर्मचारी अश्विनी शिंदे, शाम बाबा, नितीन गेंगजे, अशोक दुधवणे, विक्रांत गायकवाड, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीर, मधुकर चव्हाण, बिभीषण कन्हेरकर, अनिल महाजन, सनी जोंधळे, महंमद नदाफ, धनराज किरनाळे, दादा पवार यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen + 17 =