पिंपरी  मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळच्या ६ तासात म्हणजेच १ वाजेपर्यंत ३१.११ टक्के एवढे मतदान झाले आहे. उन्हाचा कडाखा लक्षात घेता सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. आता जसजसं दुपारी उन्हाचा कडाका वाढणार आहे तसे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी चार नंतर मतदार मतदानाकरिता घराबाहेर पडतील आणि सुमारे ६० टक्क्यापर्यंत मतदान होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात ही प्रमुख लढत होत आहे.

पनवेल ३१.०९%

कर्जत –  ३२.०८%

उरण –  ३१.०४%

मावळ २३.६८%

चिंचवड ३४.१६%

पिंपरी ३१.०१%

सुमारे ६० टक्क्यापर्यंत मतदान होईल असा अंदाज – 

मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळच्या ४ तासात म्हणजेच सकाळी ११ वाजेपर्यंत १८.०४ टक्के एवढे मतदान झाले आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात ही प्रमुख लढत होत आहे. उन्हाचा कडाखा लक्षात घेता सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. आता जसजसं दुपारी उन्हाचा कडाका वाढणार आहे तसे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी चार नंतर मतदार मतदानाकरिता घराबाहेर पडतील आणि सुमारे ६० टक्क्यापर्यंत मतदान होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मावळ मतदारसंघात एकूण मतदार : २२ लाख २७ हजार १३३, पुरुष मतदार : ११ लाख ६५ हजार ७८८, महिला मतदार : १० लाख ६१ हजार ३१३, इतर मतदार ३२, एकूण मतदान केंद्रे २५०४, मतदान यंत्रे : २५०४, एकूण कर्मचारी : १२ हजार ६५९, संवेदनशिल केंद्र ८३

 

विधानसभा निहाय एकूण मतदान – 

पनवेल – १७.१३%

कर्जत –  १८.७५%

उरण –  १६.८७%

मावळ – १७.४८%

चिंचवड – १९.७८%

पिंपरी – १७.८९%

०००००००००

 मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.६९ टक्के मतदान

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात म्हणजेच सकाळी ९ वाजेपर्यंत ५.६९ टक्के एवढे मतदान झाले आहे.

पनवेल – ५.७२%

कर्जत – ४%

उरण – ४%

मावळ – ५.१२%

चिंचवड – ६.४२%

पिंपरी – ७.८९

०००००००००००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − eight =