चौफेर न्यूज – आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘दंड’ थोपटले आहे. खासदार बारणे यांच्या पुढाकाराने लोणावळा येथील कुमार रिर्साट येथे उद्या (शुक्रवार दि.१५ जून) रोजी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रमुख वक्ते उपस्थित राहणार असुन या शिबिराचा समारोप जलसंपदा मंत्री विजयबापु शिवतारे यांच्या उपस्थित होईल, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली आहे.

या शिबिरासाठी आमदार मनोहरशेठ भोईर, आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे, रायगड जिल्हा महिला संघटिका रेखाताई ठाकरे, रायगड जिल्हा महिला संपर्कप्रमुख किशोरी पेंडणेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतिल पदाधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे वक्ते शशांक मोहिते, दिपक शेडे, नितीन बानगुडे पाटील उपस्थित राहणार आहेत.

सकाळच्या सत्रात शशांक मोहिते यांचे वक्ता प्रशिक्षण शिबिर या विषयावर मार्गदर्शन होणार असुन दुपारच्या सत्रात दिपक शेडे यांचे निवडणुक व बुथ व्यवस्थापन व शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचे मी भगवा फडकवणारच या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या शिबिराचा समारोप जलसंपदामंत्री विजयबापु शिवतारे यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.

००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − sixteen =