चौफेर न्यूज – मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र इच्छुक असलेले पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी लोकसभेसाठी चांगलीच कंबर कसली आहे. आज कर्जत-खालापूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाघेरे पाटील यांनी मावळ मतदार संघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.

कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार सुरेश लाड यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसेच शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, शहर उपाध्यक्ष संतोष वाघेरे आदी उपस्खित होते.

गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. पवारांची तिसरी पिढी, अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार यांची मावळातून राजकीय एंन्ट्री होणार असल्याची चर्चा झाली. परंतू खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पार्थ यांच्या मावळातील उमेदवारीला पुर्नविराम दिला आहे. दरम्यान नुकत्याच मुंबईत पक्षाच्या बैठकीत पवारांनी मावळचा आगामी खासदार राष्टवादीचाच झाला पाहिजे असे आवाहन केले आहे.

शरद पवारांच्या या आवाहनानंतर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी मावळसाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षभरापासून संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ चांगलाच पिंजून टाकला आहे. उमेदवारी मिळणारच या अपेक्षेने वाघेरेंनी मावळ मतदारसंघात जोरदार फिल्डींग लावली आहे. आज कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार सुरेश लाड यांच्या वाढदिवसानिमित्त वाघेरेंनी मावळात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. वाघेरे यांच्या सुरू असलेल्या तयारीमुळे राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 5 =