चौफेर न्यूज – एका २४ वर्षांच्या मुलाने आपल्या आई वडिलांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेओराम (वय ५५) आणि सोना देवी (वय ४२) अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचा २४ वर्षांचा मुलगा ड्रग अॅडिक्ट असल्याचीही माहिती समोर येत आहे.

कुरुक्षेत्र येथील शाहबाद तालुक्यात असलेल्या चारूनी गावात ही घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी आई वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करणाऱ्या मुलाला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे, अंमली पदार्थ घेण्यासाठी पैसे मिळत नसल्यानेच या मुलाने आई वडिलांना ठार केले असावे असे पोलिसांनी म्हटले आहे.

गुरुवारी रात्री ही घटना घडली तेव्हा हा मुलगा दारूच्या नशेत होता, प्राथमिक तपासाअंती हीच माहिती समोर येते आहे की अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असलेल्या या मुलाने आई वडिलांशी वाद होत असल्यानेच त्यांची हत्या केली. कुरुक्षेत्रचे पोलीस अधीक्षक राजेश कलिया यांनी ही माहिती दिली. हिंदु्स्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे. २४ वर्षांच्या या मुलाचे नाव विशाल असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी विशालच्या आई वडिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

विशाल आणि त्याची एक बहिण अशी दोनच मुले त्याच्या आई वडिलांना होती. अशी माहिती त्याच्या गावात वास्तव्य करणाऱ्या सुरेश कुमार या माणसाने दिली आहे. विशाल ड्रग अॅडिक्ट होता आणि त्याच्या आई वडिलांना कायम त्रास देत असे, त्यांच्यात कायम वाद होत असत असेही सुरेश कुमारने पोलिसांना सांगितले. विशाल त्याच्या आई वडिलांना इतक्या क्रूर पद्धतीने हत्या करेल असे मात्र कधीच वाटले नव्हते असे सुरेश कुमार आणि गावातल्या काही लोकांनी म्हटले आहे. विशाल त्याच्या घरापासून लांबच असे, जेव्हा घरी येत असे तेव्हा त्याचा आई वडिलांशी वाद होत असे. विशालने आधी त्याच्या आईला ठार केले आणि नंतर वडिलांना मारले असेही त्याने कबूल केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − 1 =