चौफेर न्यूज सुंजवान हल्ल्यात पाच काश्मिरी मुस्लिमांचा मृत्यू झाला असून जवानांचाही यामध्ये समावेश होता. यावर आता सर्व गप्प का? असा सवाल उपस्थित करत एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदुत्ववादी संघटना, सताधाऱ्यांवर टीकेच झोड उठवली.

सुंजवान हल्ल्यात मृत झालेल्यांमध्ये सात पैकी पाच मुसलमान होते. आता सारेच त्यांच्या मृत्यूवर शांत आहेत. कोणीही काही बोलायला तयार नाही. या मुद्द्यावर ऐवढी शांतता का, असे ते म्हणाले. मुस्लिमांच्या देशभक्तीवर जे लोक प्रश्न उपस्थित करतात त्यांना पाकिस्तानी म्हणून हिणवतात, यातून अशांनी धडा घायला हवा, असे ते म्हणाले. देशासाठी आम्ही प्राणाची आहुती देत आहोत. मुस्लिमांनाही दहशतवादी ठार करत आहेत. ते हिंदू-मुस्लीम असा भेदभाव करत नाही. त्यांच्यासमोर केवळ भारतीय असतात. तरीही भारतातील काही लोक मुस्लिमांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × three =