पिंपरी चिंचवड ः गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये मोझे चषक 2019 या क्रीडा महोत्सव भरविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे, प्राचार्य डॉ. ए. बी. औटी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दि. 27 रोजी झाले. मोझे चषकामध्ये 4 क्रीडा-प्रकारांचा (फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी आणि व्हॉलीबॉल) असा समावेश आहे. स्पर्धा सलग पाच दिवस चालणार आहे. पहिल्या दिवसाचे सामने महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु झाले. क्रिकेट स्पर्धेत जी. एस. मोझे सी.ओ.ई (ए) बालेवाड़ी संघाने  80 धावा केल्या  व मॉडर्न कॉलेज ऑफ इंजीन्यरिंग या संघाच्या विरोधात 53 धावांनी विजय मिळवला. जी. एस. मोझे सी.ओ.ई (ए) च्या दीपक चव्हाण या फलंदाजाने 39 धावा केल्या. दुसर्‍या सामन्यामध्ये डी. वाय. पाटील सी.ओ.ई. तळेगाव यांनी 49 धावांनी जी. एस. मोझे सी.ओ.ई. (बी) या संघाचा पराभव केला.

फूटबॉल खेेळामध्ये सिंहगड इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नर्‍हे या संघाने मराठवाड़ा कॉलेज ऑफ कॉमर्स या संघाचा (1-0) ने पराभव केला. तसेच इंदिरा सी.ओ.ई. पुणे या संघाने टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांचा (4-0) ने पराभव केला. कबड्डी प्रकारात व्ही.आय.टी कामशेत या संघाने जी.पी.पी. पुणे या संघाच्या विरोधात 35-19 असा स्कोर करत विजय प्राप्त केला. तसेच एम.आई.टी.आळंदी संघाने डी.वाय.पाटील सी.ओ.ई निगड़ी यांच्या विरोधात 21-31 असा स्कोर करत आपला विजय पटकावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × two =