चौफेर न्यूज – साडेचार वर्षांपुर्वी केंद्रात सत्तास्थानी आलेल्या भाजपा सरकारने जनतेच्या भल्यासाठी एकही चांगला निर्णय घेतला नाही. मोदींनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय उद्योग, व्यवसायाला चालना मिळण्याऐवजी अर्थव्यवस्थेची नसबंदी करणारा ठरला आहे. अशी टिका पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे पेट्रोल, डिझेलचे भाव रोजच वाढत आहेत. या भाववाढी विरोधात कॉंग्रेसने आज सोमवारी भारतबंद पुकारला होता. या निमित्त शहर कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन केले. यावेळी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महापौर कविचंद भाट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, सेवा दलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, महिला प्रदेशच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, सुदाम ढोरे, बिंदू तिवारी, माजी नगरसेवक मारुती भापकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, युवा कॉंग्रेसचे नरेंद्र बनसोडे, मयुर जैयस्वाल, बाळासाहेब साळुंखे, परशुराम गुंजाळ, मकर यादव, राधिका आडागळे, बिंदू तिवारी, विनीता तिवारी, शहाबुद्दीन शेख, विरेंद्र गायकवाड, अक्तर चौधरी, नासीर शेख, गौरव चौधरी, हिरा जाघव, करणसिंग गिल, सिध्दार्थ वानखेडे, तुषार पाटील, दिपक जाधव, शितल कोतवाल, हिरामण खवळे, अॅड. अनिरुध्द कांबळे, भास्कर नारखेडे, बाबा बनसोडे, मुन्ना शेख, इसार शेख, रहिम सय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी साठेंनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑईलचे भाव दिवसेंदिवस कमी होत असताना मोदी सरकार मात्र, रोज पेट्रोल, डिझेलचे भाववाढ करुन नागरिकांची पिळवणूक करीत आहे. आगामी काळात होणा-या निवडणूकामध्ये सुज्ञ नागरिक भाजप सरकारला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. तसेच यावेळी संजोग वाघेरे पाटील, वैशाली काळभोर, गिरीजा कुदळे, दत्ता साने, कैलास कदम आदींनीही पेट्रेाल, डिझेलच्या भाववाढीविरोधात भाषण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + 9 =