चौफेर न्यूज पिंपरी चिंचवड शहरातील मोरेवस्ती येथील ३३ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस शहरात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची वाढ होत असून यावर्षात बळींचा आकडा ३२ वर पोहचला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिलेला दि.४ ऑक्टोबर रोजी थेरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर त्यांची प्रकृती खालावली. अखेर उपचारा दरम्यान ७ ऑक्टोबर रोजी त्या महिलेचा मृत्यू झाला असून जानेवारीपासून बळींची संख्या ३२ वर पोहचली आहे.

गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने आपला विळखा चांगलाच आवळला आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन शहरवासियांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + 16 =