राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने पिंपरीत भागवतांचा निषेध

चौफेर न्यूज –  वेळप्रसंगी स्व:ताच्या जीवाची बाजी लावून देशवासीयांचे रक्षण करणा-या भारतीय सैन्याबाबत अनुद्‌गार काढणारे आरएस्‌एस्‌चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस राज्यभर आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरीत दिला.

पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 13 फेब्रुवारी) पिंपरी (पुणे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भागवतांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष फझल शेख, शिक्षण मंडळ माजी सदस्य लता ओव्हाळ, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदिप गायकवाड, युवक प्रदेश संघटक विशाल काळभोर, लाला चिंचवडे, शहर युवक उपाध्यक्ष आलोक गायकवाड, हर्षवर्धन भोईर, मयुर जाधव, विशाल पवार, कुणाल थोपटे, शेखर काटे, निलेश निकाळजे, सरचिटणीस योगेश मोरे, सैफ खान, अब्दुल क्षिरसागर, साहीश कोकाटे, सनी ढाळे, कविता खराटे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, रशिद सैय्यद, मनोज जाधव, रोझारीओ डिसुझा, दिपक गायकवाड, दिपक साकोरे, वंदना कांबळे, आशा शिंदे, निर्मला माने आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

युवक अध्यक्ष विशाल वाकडकर निषेध व्यक्त करताना म्हणाले की, सैनिकांच्या जीवावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करायचा आणि त्याची वारेमाप प्रसिध्दी घ्यायची असे भाजपाचे प्रसिध्दी लोलूप नेते वागतात. जगभर भारतीय सैनिकांचा दबदबा आहे. अशा सैनिकांबाबत अनादर करणारे वक्तव्य करुन भागवतांनी सैनिकांचा व देशभरातील सव्वाशे कोटी जनतेचा अपमान केला आहे. भागवतांनी सैनिकांची व जनतेची जाहीर माफी मागावी नाहीतर त्यांच्यावर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉग्रेस राज्यभर तीव्र आंदोलन करेल असे वाकडकर म्हणाले.

कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे निषेध करताना म्हणाले की, सीमेवर जाऊन सैनिकांबरोबर फोटो काढून पंतप्रधान स्व:ताची प्रसिध्दी करुन घेतात. मनुवादी प्रवृत्तीचे सरसंघचालक मोहन भागवत सैनिकांचा अपमान करणारे वक्तव्य करतात. त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. भागवतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी शितोळे यांनी केली आहे. यावेळी वैशाली काळभोर, वर्षा जगताप, लता ओव्हाळ, पुष्पा शेळके आदींनी निषेधाचे भाषण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + 11 =