पिंपरी, दि. १2 एप्रिल २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे व आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

मनमा भवनात झालेल्या या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, बाळासाहेब त्रिभुवन, नगरसदस्या आशाताई शेंडगे, सुलक्षणा शीलवंत, माधवी राजापुरे, माजी स्थायी समिती सभापती राजाराम राजापुरे, सह आयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, वैद्यकिय संचालक पवन साळवे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वसंत साळवी, शरद जाधव, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिलवंत, नामदेव शिंत्रे आदी उपस्थित होते.

त्यानंतर पिंपरी चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासही पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, माजी महापौर अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, नगरसदस्य संतोष लोंढे, बाळासाहेब ओव्हाळ, बाबासाहेब त्रिभूवन, अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, नगरसदस्या आशाताई शेंडगे, सुलक्षणा शीलवंत, माधवी राजापुरे, सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, वैद्यकिय संचालक पवन साळवे, कार्यकारी अभियंता संजय भोसले, संजय कांबळे,प्रकाश साळवे, जीवन गायकवाड, संजय घुबे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वसंत साळवी, शरद जाधव, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिलवंत, नामदेव शिंत्रे, प्रताप गुरव, हनुमंत माळी, बापू गायकवाड आदी उपस्थित होते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 2 =