दि. १2 एप्रिल २०१७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती महोत्सवानिमित्त आयोजित ममता अंध अनाथ केंद्र, पिंपळे गुरव येथिल कलावंतांच्या कार्यक्रमाचा प्रारंभ आज सकाळी स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करुन अभिवादनाने केला.

आज सकाळी जयंती महोत्सवा निमित्त पिंपरी चौकात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ममता अंध अनाथ कल्याण केंद्र, पिंपळे गुरव, सूरसागर पार्टी, वैष्णवी असोसीएशन फॉर दि ब्लांइड, येरवडा, यांच्या कलावंतांचा सन्मान स्थायी समिती सभापती सिमा सावळे व आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसदस्या आशा शेंडगे, सुलक्षणा शिलवंत, नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, बाबासाहेब त्रिभूवन, सागर अनगोळकर, अंबरनाथ कांबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five − 1 =