पिंपरी :- ‘एक हात मदतीचा.. एक हात कर्तव्याचा’ या भावनेने सांगली, कोल्हापूर या भागातील पूरग्रस्तांसाठी कर्तव्याचे भान ठेवून शिवसेना नेत्या सुलभा रामभाऊ उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यमुनानगर येथून पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात आली.

सुलभा उबाळे यांनी २ हजार साड्या, ५०० ब्लँकेट, १ हजार शर्ट पँट, तसेच लोकांसाठी १५ दिवस पुरेल अशा सर्वं जीवनावश्यक वस्तूंचा संच, तसेच रोख स्वरूपात ११ हजार १११ रुपये पाठविण्यात आले. तसेच यावेळी एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा रामभाऊ उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, शशीकला उभे, भारती चकवे, जनाबाई गोरे तसेच मार्गदर्शक रामभाऊ उबाळे, संजय बोऱ्हाडे, नितीन बोंडे, सतीश मरळ, गणेश इंगवले , नारायण कोर्वी, मारुती उभे, युवानेते अजिंक्य उबाळे, युवासेनेचे अमित शिंदे, कौस्तुभ गोळे तसेच यमुनानगर परिसरामधील नागरिक मोठ्या प्रमाने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 5 =