चौफेर न्यूज –  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने नागरिकांनी स्वत:हून बंद ठेवली आहेत. मात्र निगडी यमुनानगर येथे पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका कंटेनरची तोडफोड करण्यात आली.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निगडी यमुनानगर परिसरात हा प्रकार घडला. काही दुचाकीवर आलेल्या काही तरूणांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वाहनाची तोडफोड केली. कचरा उचलण्याकरिता वापरला जाणाऱ्या कंटेनर ट्रकचे यात नुकसान केले. तरूणांनी येऊन या कंटेनरच्या काचा फोडल्या असून या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वगळता शहरात अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × three =