‘बाहुबली २’मुळे अनेक कलाकारांची नव्याने ओळख झाली आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड मधीलप्रताप बोऱ्हाडे आणि डी एन इरकर हे दोन मराठी कलाकारही या ऐतिहासिक चित्रपटाचे साक्षीदार आहेत. हे दोघे पिंपरी- चिंचवडंमधील भोसरी या गावात वास्तव्यास आहेत.

‘बाहुबली २’ या चित्रपटांमधील ‘देवसेना’ या पात्राचा मेकअप दोघांनी केला आहे.

‘बाहुबली २’चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी सुरुवातीला फॉरेन मधील आणि मुंबईच्या काही मेकअप आर्टिस्टना ‘देवसेना’ या पात्राच्या मेकअपसाठी बोलवले होते. मात्र त्यांच काम न आवडलेल्या राजमौली यांनी पिंपरी- चिंचवड मधील प्रताप बोऱ्हाडे आणि डी.एन. इरकर यांना नोव्हेंबर २०१६ ला बोलावले.

त्यानंतर या जोडीने हैद्राबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये त्यांची कला दाखवत अवघ्या तीन तासात राजमौली यांच मन जिंकले आणि ‘बाहुबली २’ या ऐतिहासिक चित्रपटातील ‘देवसेना’ या पत्राचे मेकअप साकारण्याचे काम या दोघांना देण्यात आले. विशेष म्हणजे मेकअपचे सर्व साहित्य परदेशातून आणले होते.

१५-२० वर्ष साखळीत जखडलेली देवसेना ही मेकअप मधून साकारायची होती. तीच्या संपूर्ण मेकअप आणि लूकमधून ती राणी देखील असल्याचे वाटायला हवे होते. ही खरी आमच्या सामोरील एक पैज होती जी आम्ही पूर्ण केली अशी माहिती इरकर आणि बोऱ्हाडे यांनी दिली.

‘मर्दानी’, ‘उडता पंजाब’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांसाठीही या जोडीने काम केले. आगामी ‘बादशाहो’ या चित्रपटातही त्यांच्या कलेचा ठसा उमटवला आहे. एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या माजिद मजिदी यांच्या ‘बियाँड द क्लाऊड’साठीही त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × three =