चौफेर न्यूज – देश, धर्माच्या रक्षणासाठी युवा शक्तीची एकजूट महत्वाची आहे. त्यासाठी सर्वच क्षेत्रातील  युवकांचे संघटन महत्वाचे आहे व या संघटनातून उभा राहिलेल्या चांगल्या कार्याला जेष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पर्युषण पर्वनिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा ६ तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, संतोष कर्नावट, मनोज सोळंकी सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी पर्युषण पर्वानिमित्त सकाळी अंतगड सुत्रवाचन, प्रवचन, नवग्रह अनुष्ठान जप, मांगलिक, कल्पसुत्र वाचन, देवसी प्रतिक्रमण आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

यावेळी ज्येष्ठ उद्योजक कांतीलालजी गोकुळदासजी मुनोत यांना वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, उद्योजक संतोष कर्नावट आणि विश्वस्तांच्या हस्ते मुनोत यांचा गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + 20 =