पिंपरी चिंचवड :  सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापूराने थैमान घातले आहे. तेथील संपूर्ण जनजीवण विस्कळीत झाले आहे. हजारों नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. सर्वच स्तरातून त्यांना मदत केली जात आहे. पिंपरी विधानसभा युवासेनेने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याची मदत युवासेनेकडून रवाना करण्यात आली आहे.

कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्त नागरिकांनासाठी पिंपरी युवासेनेतर्फे ५०० कुटुंबियांना पुरेल इतक्या वस्तू व अन्नधान्य पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाला गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, मीठ,चहापत्ती, कोलगेट, खोबरेल तेल, साबण, तूरडाळ, मसाला आदी आवश्यक वस्तू पाठविण्यात आल्यात. यात सुमारे दिड टन धान्य व वस्तू पाठविण्यात आल्या आहेत.

यावेळी युवतीसेना अधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, विभाग संघटिका कामिनी मिश्रा, विद्या प्रसाद देसाई, सनी कड, ओंकार जगदाळे,  अमित शिंदे,  अजय पिल्ले, अजित बोराडे, रवी नगकर, विकास गायकवाड, अविनाश जाधव, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × three =