चौफेर न्यूजकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. कालच्‍या (१५ मे) निकालानंतर कर्नाटकात नाट्‍यमय घडामोडी घडल्‍या. दरम्‍यान, निकालानंतर दुसर्‍या दिवशी राज्‍यात सत्ता स्‍थापन करण्‍यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे १३ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे म्‍हणत भाजपनेही सत्‍ता स्‍थापनेचा दावा केला आहे. शिवाय, एक अपक्ष उमेदवार आमच्‍यासोबत असल्‍याचा दावाही भाजपने केला आहे. तर आज येडीयुरप्‍पा यांनी सत्ता स्‍थापनेचा दावा राज्‍यपालांकडे केला. त्यानंतर उद्या गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं येड्डियुरप्पा यांनी सांगितलं. यासाठी काही वेळापूर्वी येडीयुरप्‍पा राज्‍यपालांच्‍या भेटीसाठी रवाना झाले होते. भेटीनंतर  राज्‍यपाल सकारात्मक निर्णय घेतील, असे येडियुरप्‍पा यांनी म्‍हटले आहे. येडियुरप्‍पा यांची भाजपच्‍या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे.

भाजपला ११२ हा जादूई आकडा मिळवता आला नाही. भाजप ११५ जागापर्यंत मजल मारेल, असे वाटत होते. परंतु, भाजपचे संख्‍याबळ दुपारनंतर १०३ जागांवर स्‍थिरावलं. काँग्रेसचं सरकार बनवण्‍याचं स्‍वप्‍न धुळीस मिळालं. कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. त्‍यात काँग्रेस आणि जेडिएस यांनी हातमिळवणी केल्‍याने भाजपची स्‍थिती दोलायमान होती. दरम्‍यान, काँग्रेससोबत जाण्‍याचा आम्‍ही आधीच निर्णय घेतला आहे, त्‍यामुळेच जेडीएस आमदारांची बैठक बोलावल्‍याचे कुमारस्‍वामी यांनी म्‍हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − ten =