चौफेर न्यूज – मुंबई – अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रवास साहसी ठरणार असून मुंबईतील ठाणे-विरार टप्प्यातून जाताना समुद्रातून २१ कि.मी. लांबीच्या बोगद्यातून या बुलेट ट्रेनचा प्रवास होणार आहे. मुंबई-अहमदाबाद हे ५०८ कि.मी.चे अंतर अगदी कमी काळात पार करणारी बुलेट ट्रेन ठाणे खाडीनजीक सागराखालील बोगद्यातून जाणार आहे.

या बोगद्यासाठी आवश्यक असणारी १५ दिवसांची स्टेसमिक रजिटिव्हीटी टेस्ट पुर्ण करण्यात आली असून, जपानला तसा अहवाल पाठविण्यात आलेला आहे. ही चाचणी ११ ते २४ डिसेंबर दरम्यान करण्यात आली आहे. १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्च बुलेट ट्रेनसाठी अपेक्षित आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्रदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. येत्या जुन महिन्यापासून बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असणारे सिव्हिल काम सुरु करण्यात येणार आहे. या गाडीचा वेग ताशी साडेतीनशे किलोमीटर असला तरी प्रत्यक्ष सरासरी वेग ताशी ३२० किलोमीटर असेल. ५०८ किलोमीटर अंतर ही गाडी दोन तासात कापणार आहे. सध्या दुरांतो एक्सप्रेस सात तासात हे अंतर कापते. मुंबई-अहमदाबाद रेल्वेचा बहुतांश मार्ग हा उन्नत असला तरी ठाणे खाडी ते विरार दरम्यान ही गाडी सागरी बोगद्यातून जाईल.

बुलेट ट्रेनची माहिती देण्यासाठी मॅग्नेट महाराष्ट्रामध्ये इ ५ सिरीजचे कोच दाखविण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला जपानमधील संकेशनमधील बुलेट ट्रेनसाठी या प्रकारचे कोच चालविण्यात येत आहेत. बुलेट ट्रेनसाठी जे टेंडर काढण्यात येणार आहे, त्यामध्ये २० टक्के जपानसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. तर उरलेल्या ८० टक्क्यामध्ये देशातील किंवा परदेशातील कोणत्याही कंपन्या सहभागी होऊ शकणार आहेत. बुलेट ट्रेनसाठी ठाणे जिल्ह्यातील जी जमीन आवश्यक आहे, त्यासाठी जमिन हस्तांतरणासाठीचा प्रस्ताव स्थानिक जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राष्टीय हाई स्पीड रेल निगम लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुमार यांनी दिली. बुलेट ट्रेनच्या एकुण मार्गात ८ बोगदे असणार आहेत. त्यामध्ये ठाण्यातील खाडीतून जाणारा बोगदा सर्वात मोठा असणार आहे. बुलेट ट्रेनसाठी एकुण २९ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी २५ हजार कर्मचारी हंगामी तत्वावर असणार आहेत तर ४ हजार कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या वडोदरा येथील रेल्वे विद्यापठात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गात एकूण ४७ आरओबी असणार आहे. त्यापैकी २७ आरओबी राज्यात असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × three =