दिनांक 26/1/2017 रोजी प्रचिती प्री प्रायमरी स्कूल, पिंपळनेर येथे येलो डे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचे फुगे आणि कार्डशिट द्वारे हॉल सजवण्यात आला. येलो डे निमित्ताने श्रीमती निलीमा देसले यांनी सुबक रांगोळी काढली. सर्व विद्यार्थ्यांनी पिवळ्या रंगाची वेषभूषा केली आणि सर्वांचे मन मोहून घेतले.

सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री.एम.आर.गावित सर व व्यवस्थापक श्री.राहूल अहिरे सर यांनी पद ग्रहण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती प्रतिभा अहिरराव यांनी केले. श्रीमती अनिता पाटील यांना पिवळ्या रंगाला अनुसरून इंग्रजी गीत गाऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. श्रीमती कृषाली भदाणे यांनी पिवळ्या रंगाविषयी विविध उदाहरणे देऊन माहिती सांगितली. श्री. गावित सर यांनी पिवळा रंग सूर्याचा असून त्या अनुषंगाने माहिती संकलन केले. व्यवस्थापक श्री. राहूल अहिरे सर यांनी भारतीय समाज रचनेवर पिवळ्या रंगाचे फसर पूर्वीपासून अधिराज्य गाजवत आहे असे आपल्या भाषणांतून प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी श्रीमती पूनम तवर यांनी आभार मानले. माधुरी सैंदाणे, संगिता कोठावदे व जयेश घरटे यांचे सहाय्य लाभले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + three =