चौफेर न्यूज :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात महापौर राहूल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांनी रक्तदान करून या शिबिराचा प्रारंभ केला.

आज सकाळी महानगरपालिकेच्या प्रांगणातील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास महापौर राहूल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौघुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ह प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य शितल शिंदे, माऊली थोरात, बाबु नायर, केशव घोळवे, शैलेश मोरे, मोरेश्वर शेंडगे, नगरसद्स्या आरती चौंधे, निर्मला कुटे, निता पाडाळे,  शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या महापौर संघ विरुद्ध आयुक्त संघ या रस्सीखेच स्पर्धेत आयुक्त संघाने बाजी मारली. त्यानंतर झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत पुरूष गटात महापौर राहूल जाधव यांनी प्रथम बबन झिंजुर्डे यांनी द्वितीय तर प्रमोद ओंभासे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यानंतर रंगलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये महिला पदाधिकारी, अधिकारी, कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सह्भाग घेतला. मनपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे ८० जणांनी रक्तदान केले. दुपारी आयोजित करण्यात आलेल्या अभिरूप सभेत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांनी एकच धमाल उडवून दिली. अभिरूप सदस्यांच्या गोंधळामुळे अभिरूप सभा वर्षभरासाठी तहकूब करण्यात आली.

तत्पूर्वी सकाळी वर्धापननिमित्त पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी मनपा व सेफ किड्स संस्थेच्या सयुंक्त विद्यमाने चाफेकर चौक ते मनपा मुख्यालय अशी सायकल फेरी काढण्यात आली. याचे उदघाटन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. यामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य सुरेश भोईर, नगरसदस्या अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांच्या १०० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =