पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पत्राची दखल घेवून प्रभाग क्र.28 रहाटणी-पिंपळे सौदागर मधील स्टॉर्म वॉटर लाईनच्या चेंबरची साफसफाईच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे राकेश सौदाई यांच्या देखरेखीखाली हे काम चालू करण्यात आले.

नाल्यामध्ये व स्टॉर्म वॉटर लाईनच्या चेंबरमध्ये माती व कचरा पडल्यामुळे पावसाळ्यात रोडवरचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पावसाचे पाणी रोडवर साचून घाणीचे साम्राज्य होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नत निर्माण होतो. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी रहाटणी-पिंपळे सौदागर मधील सर्व स्टॉर्म वॉटर लाईनचे चेंबरची व सर्व नाल्यांची साफसफाई करून घेण्यात यावे. असे निवेदन नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांना दिले होते. त्याची दखल घेत या प्रभागातील नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आले असल्याचे काटे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 + two =