चौफेर न्यूज – राज्याला अघोषित लोडशेडिंगच्या संकटात लोटणारे राज्याचे  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्री कमी आणि ठेकेदार जास्त असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथील निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा या तीन राज्यांकडे वळवून महाराष्ट्राला अंधारात ढकलण्याचे पाप मोदी-फडणवीस सरकारने केल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्यासोबतच ऊर्जा खात्याशी काडीचाही संबंध नसलेल्या विश्वास पाठक यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे, असाही आरोप मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्र अंधारात लोटला

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेची सेमीफायनल म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीत भाजपला विजयी करण्यासाठी सर्वच गोष्टी सध्या या तीन राज्यांकडे वळवण्यात आल्या आहे. महाराष्ट्रासाठीचा कोळसा देखील या तीन राज्यात वळवून मोदी-फडणवीस सरकारने महाराष्ट्राला अंधारात लोटले असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

सरकारकडे नियोजनाचा आभाव

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच नवाब मलिक यांनी राज्यात अघोषित लोडशेडिंग सुरु असल्याचे सागंतानाच राज्यात ११-१२ तास लोकांना वीज मिळत नाही. सरकारला वीजेची कमतरता भासत होती तर त्यांनी जनतेला लोडशेडिंगबाबात जाहीरपणे माहिती देणे किंवा कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक होते. ती जबाबदारी सरकारची होती मात्र सरकारने तसे न करत अघोषित लोडशेडिंग जाहीर केली आहे. आज राज्यात ऊर्जा विभागाने काल जी इंटरनल नोट तयार केली आहे. त्या नोटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, २० टक्क्यांनी डिमांड वाढली होती आणि एकंदरीत ३ हजार मेगावॅटचा तुटवडा होता तर त्यापध्दतीची नोट जाहीर करायला हवी होती. राज्यातील जिल्हयात किती तास वीज नाही याची घोषणा केली पाहिजे होती. त्यामुळे जनतेला स्वत:चे नियोजन करता येवू शकते. परंतु सरकार ही माहिती लपवून ठेवत आहे त्यांना जनतेला माहिती दयायची नाही जनतेला अडचणीत आणायचे आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

थर्मलपॉवर स्टेशनला कोळसा पुरवठा होत नसल्याने सगळे पॉवर प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण क्षमतेने चालवता येत नाही. राज्याला दरदिवशी ३२ रेक कोळशाची गरज आहे. मात्र निम्न कोळसापुरवठा होलइंडिया आणि त्यांच्या उपकंपन्या आहेत त्याच्या माध्यमातून कोळसा पुरवठा होतो. ही वीजटंचाई राजकीयदृष्टया तयार करण्यात आल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

देशाचे कोळसामंत्री पियुष गोयल वारंवार सांगत आले आहेत की, देशामध्ये कोळशाचा तुटवडा नाही. मग देशात कोळशाचा तुटवडा नसेल तर मग निम्न पुरवठा या राज्याला का होत नाही याचं उत्तर पियुष गोयल यांनी दयायला हवे. एकंदरीत रेल्वे मार्गानेसुध्दा पुरवठा होवू शकत नाही अशी काही परिस्थिती असताना चंद्रपूरला रोडमार्गे पुरवठा करु अशी घोषणा करण्यात आली त्याचाही पुरवठा होत नाही. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी देशभरामध्ये कोळशाचा तुटवडा आहे हे सिध्द होते असेही नवाब मलिक म्हणाले.

२०१४ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कसा असेल त्याची ब्लूप्रिंट केली होती. त्या विश्वास पाठकांना चारही कंपन्यामध्ये संचालक करण्यात आले. त्यांना सल्लागार पद देवून एनर्जीमंत्री असं पद देण्यात आले आहे. त्यांना एनर्जीमधील काय कळते याचं उत्तर द्यावे.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक,प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण आणि संजय तटकरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + 4 =