चौफेर न्यूज – स्टायपेंड अर्थातच विद्यावेतनामध्ये वाढ करावी, या मागणीसाठी राज्यभरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. विद्यावेतनामध्ये वाढ करावी हीच या डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे. मंगळवारी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संघटनेची राज्य सरकारसोबत बैठक झाली होती. या बैठकीत कोणतंही लेखी आश्वासन न मिळाल्याने अखेर संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर जात असल्याने रुग्णालयांमधील सेवा विस्कळीत होऊन रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्यता आहे. या संपात बीएमसी रुग्णालयामधील डॉक्टरही सहभागी होणार असल्याची माहिती आहे. इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मिळणारं विद्यावेतन फारच कमी आहे. इतर राज्यांमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 15 ते 30 हजारांपर्यंत विद्यावेतन मिळत असताना, महाराष्ट्रात मात्र फक्त सहा हजार रुपये दिले जातात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three + 20 =