चौफेर न्यूज –  दसऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. नव्या मंत्रिमंडळात अनेक काही चेहरे समाविष्ट होणार असले तरी कार्यक्षमता या निकषावर काहीजणांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. यात लातूरचे संभाजी पाटील निलंगेकर, मुंबईच्या विद्या ठाकूर आणि विनोद तावडे यांचा समावेश असेल असे सूत्रांनी सांगितले. विस्तारासाठी नव्या मंत्र्यांची यादी दिल्लीला पाठविण्यात आल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

कामगिरी हा निकष भाजपने अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कार्यक्षम आणि पक्ष संघटना वाढीला पूरक ठरतील अशा चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या दोन ते तीन मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. यात शिक्षण मंत्री विनोद तावडे, कामगार मंत्री संभाजी पाटील आणि महिला बाल कल्याण राज्य मंत्री विद्या ठाकूर यांचा समावेश असल्याची शक्यता भाजप वर्तुळात चर्चिली जात आहे. शिवसेनेला  अंगावर घेणारा आक्रमक मराठी चेहरा म्हणून आशिष शेलार यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला दोन जागा मिळण्याची शक्यता असून रिपाइंलाही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

राज्यातील आमदार आणि खासदार याना त्यांचे प्रगतीपुस्तक देण्यात आले आहे. त्यात ४० टक्के आमदार आणि खासदारांना अपेक्षेइतके गुणांकन झालेले नाही. या अहवालावर भाजपच्या ६ खासदारांचा पत्ता कट होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकांना अद्याप ६ महिन्यांचा अवकाश असला तरी खराब कामगिरीचा पहिला फटका मंत्रिमंडळातील काही विद्यमान सदस्यांना बसण्याची शकयता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 5 =